मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला एक महिन्याचा अवधी दिला आहे. या एक महिन्यात सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं, ३१ व्या दिवशी मराठा समाजाच्या हातात आरक्षण प्रमाणपत्र असावं, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी आज दिला आहे. गेल्या १५ दिवासंपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अद्यापही यश आलेलं नाही. सरकारकडून सातत्याने बैठका सुरू असतानाही तोडगा न निघाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली.

“एक तरुण नेता १५ दिवसांपेक्षा जास्त काळ उपोषणाला बसला आहे आणि सरकार त्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी आहे. सरकारच्या वतीने बिनकामाचे नेते जाऊन चर्चा करतात. त्यांच्या कानात कुजबूज करतात. त्यांना जरांगे पाटलांनी चांगलं झाडलेलं आहे हे समोर आलं. महाराष्ट्रातलं वातावरण निवळावं, कोणताही तणाव राहू नये आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी अधिकृतपणे चर्चा व्हावी, एजंटच्या माध्यमातून नाही. जरांगे पाटील हे त्यांची भूमिका सोडतील असं मला पहिल्यापासून वाटत नाही. तो फाटका माणूस आहे. त्यांना राजकारणात काहीही मिळवायचं नाही, अशा पद्धतीची त्यांची भूमिका मला दिसली. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत असं मला दिसतंय. त्यांनी एक महिन्याचा सरकारला अवधी दिला. मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण ही किचकट प्रक्रिया आहे. कायदेशीर, तांत्रिक प्रक्रियेतून या निर्णयापर्यंत जावं लागेल हे सत्य आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
Sanjay Rauts statement protested by Thane Small Scale Industries Association
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा ‘टिसा’कडून निषेध

हेही वाचा >> “देवेंद्र फडणवीसांचा संबंध नसताना त्यांनी माफी मागितली”, अजित पवारांचं विधान!

दरम्यान, मनोज जरांगेंनी सरकारला एक महिन्याचा अवधी दिला असला तरीही आंदोलन मागे घेतलेलं नाही. तसंच, उपोषणही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याच हातून सोडणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. याबाबत आज संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, “राज्य तीन लोकांच्या हातात आहे. तिन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. अशावेळी तुम्ही सरकार म्हणून त्यांना आश्वासन द्या ही त्यांची भूमिका असेल. एकटे जरांगे उपोषणाला बसले असले तरीही त्यांच्यासमोर शेकडो लोक समोर आहेत. त्यांच्या साक्षीने त्यांच्या उपस्थितीत शब्द द्यावा अशी भूमिका असेल तर त्यात चुकलं काय? पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देतो असे फडणवीस म्हणाले होते. आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो तेव्हा आमच्या हातात सत्ता द्या २४ तासांत आरक्षण देतो असं फडणवीस यांचं वक्तव्य आहे. जरांगे पाटलांच्या लक्षात आलं असेल की हे फडणवीस व्यक्ती नसून वल्ली आहेत यावरून किती विश्वास ठेवायचा म्हणून त्यांनी अशी अट घातली आहे”, असंही राऊत म्हणाले.

तिन्ही पक्षांची आज बैठक, काँग्रेस गैरहजर का?

“इंडिया आघाडीची आज बैठक झाली. इंडिया आघाडीत १३ जणांची समन्वयक समिती आहे. या समितीची ही बैठक होती. या बैठीकत काही नवे विषय समोर आले आहेत. त्यासंदर्भात महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाचं राज्य असल्याने कोणते विषय यावेत”, घ्यावेत यावर चर्चा झाली”, असं राऊत म्हणाले. तसंच, मुंबईत आज सिल्वर ओकवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचीही बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस नेते उपस्थित होते. याबाबत संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नाना पटोले त्यांच्या या एका यात्रेत सहभागी आहेत, त्यामुळे ठाकरेंनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, मराठा समाजाच्या आंदोलनाने वेगळं वळण घेतलंय, विशेष अधिवेशन का बोलावलंय याबाबत सर्वांत मोठा संभ्रम महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र तोडण्यासाठी हे अधिवेशन आहे, असा आरोप आधीच नाना पटोलेंनी केला आहे. यासंदर्भात चर्चा झाली”, अशी माहिती राऊतांनी दिली.