सावंतवाडी: मळगाव रेल्वे स्थानकाजवळ सिल्व्हर एकर इमारतीच्या समोरील रस्त्यावर बुधवारी रात्री भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या इनोव्हा कार क्रमांक MH११-DD-५१९२ गाडीवर हल्ला चढवला असल्याचे वृत्त पसरले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ उडाली. राजकीय पटलावर एकच चर्चा सुरू झाली. मात्र घडलेला तो प्रकार हेतुपुरस्सर हल्ला नव्हता तर तो वाट चुकलेला परप्रांतीय कामगार होता असे पोलिस चौकशीत समोर आले आहे असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान उमेदवार विशाल परब यांनी देखील कोणाही विरोधात व्यक्तीगत तक्रार दिली नाही असे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तळवडे मळेवाड- सावंतवाडी मार्गावर रेल्वे स्थानकाजवळील सिल्व्हर एकर इमारतीच्या समोरील रस्त्याच्या कडेला दांडा हातात घेऊन उभा असलेला इसम समोर येताच गाडीचे ब्रेक वेगाने लावताच गाडी साईडला गेली. गाडीतून ड्रायव्हर आदी उतरताच संशयीत इसम जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा >>>वनस्पती रानमोडीचा नरकासूर‌ समजून दहन

दरम्यान याप्रकरणी भाजपचे बंडखोर युवा उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला, ड्रायव्हर बचावले अशा बातम्या पसरल्या.  पोलिसांनी या साऱ्या प्रकाराची चौकशी केली असता हल्ला करण्याच्या इराद्याने हा इसम तेथे आला नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले, असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान,या पार्श्वभूमीवर उमेदवार विशाल परब यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी तेव्हा घडलेला प्रकार पोलिसांना सांगितले. मात्र आपली कोणाही विरोधात तक्रार नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी दाखल असलेल्या अदखलपात्र तक्रारीचे गुन्ह्यांत रूपांतर झाले नाही असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी म्हटले आहे.भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर झालेल्या कथित हल्ल्याचा आता पोलखोल झाला आहे. मुळात हा हल्ला नसून वाट चुकलेल्याने कणकवली कडे जाण्यासाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न करणारा तो चिरेखाण कामगार असल्याचे समोर आले आहे. सावंतवाडी मतदार संघामध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब हे काल बुधवारी रात्री मळेवाड वरून सावंतवाडीच्या दिशेने परतत असताना रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान निरवडे येथे एका परप्रांतीय व्यक्तीने गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार ओमकार पावसकर यांनी दिल्यानंतर या घटनेचा तपास सावंतवाडी पोलिसांनी केला.

हेही वाचा >>>Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरेंना महायुतीत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

कणकवली – तरळे येथे असलेल्या गावातील चिरेखणीमध्ये झारखंड रांची येथील कामगार संजय गोप व त्याच्यासोबत असलेला विनोद गोप हे आपल्या झारखंड येथील गावातून २८ ऑक्टोबर रोजी रेल्वेत बसले ते बुधवारी मडगाव जंक्शन येथे उतरून पुन्हा कणकवली येथे परतत असताना संजय गोप हा सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे डोकं दुखतंय म्हणून उतरला. त्यानंतर रेल्वे कणकवलीच्या दिशेने गेली ही रेल्वे त्याला चुकली मात्र त्याचा भाऊ विनोद गोप हा कणकवली येथे गेला. सावंतवाडी वरून कणकवलीला जाण्यासाठी नंतर रेल्वे नसल्याचे समजल्यावर त्याने कोणत्यातरी गाडीला हात दाखवून कणकवली येथे जाण्याचे ठरविले त्यामुळे रेल्वे स्थानकापासून २०० मीटरच्या अंतरावर निरवडे गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या सिल्वर बिल्डिंगच्या समोर तो वाहनांना हात दाखवत होता त्यावेळी त्याच्या हातामध्ये दांडा होता त्याच दरम्याने भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब हे त्या रस्त्याने जात असताना त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला गाडी थांबल्यावर त्या गाडीतून काही माणसे उतरल्यावर त्याने घाबरून पळ काढला त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान त्याचा भाऊ विनोद गोप हा सुद्धा सावंतवाडी रेल्वे स्थानकावर  त्याच्या शोधात आल्यावर संजय गोप याला पोलिसांनी पकडल्याचे त्याला समजले. संजय गोप याच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी घडलेली घटना सांगितली. या दरम्यान पोलिसांनी रेल्वे तिकीट, आधारकार्ड आदी सर्व माहिती तपासून घेतली. तसेच तळरे येथे चिरेखाण वर जाणार होता तेथील माहिती घेतली.

पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले, या प्रकरणी चौकशी केली असता हेतुपुरस्सर हल्ला करण्याच्या इराद्याने संजय गोप दांडा घेऊन रस्त्यावर आला असल्याचे निष्पन्न झाले नाही. तसेच उमेदवार विशाल परब व तक्रारदार ओमकार पावसकर यांनीही बोलावून काही सांगायचं आहे का? तेही तपासले. मात्र या प्रकरणी चौकशीत हल्ला चढवला असल्याचे निष्पन्न झाले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येणार नाही. मात्र अदखलपात्र तक्रारीची चौकशी झाली आहे.