अजित पवार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीतले कलह रोज चव्हाट्यावर येत आहेतच. बुधवारी तर शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामनाही रंगला. अजित पवार आणि त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्याने शिंदे गटातले आमदार आणि खासदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा एक बैठक पार पडली. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नावर थेट उत्तर दिलं आहे.

उदय सामंत यांनी काय म्हटलं आहे?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे आमदार, खासदार यांची बैठक पार पडली. लोकसभेचं अधिवेशन, विधानसभेचं अधिवेशन याविषयी मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. भविष्यात संघटनात्मक मांडणी कशी करायची यावरही चर्चा झाली. आम्ही सगळे मंत्री बाळासाहेब भवन या ठिकाणी बसलं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत असेही आदेश एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आमदारांच्या अडचणी, खासदारांच्या अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या. लोकसभेत काय रणनीती असेल तेदेखील त्यांनी सांगितलं.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका

शिंदे गट मुळीच नाराज नाही, याविषयी बैठकीत चर्चाही नाही

शिंदे गटात अजित पवारांमुळे नाराजी पसरली आहे का? असा प्रश्न विचारला असता उदय सामंत म्हणाले, “ही बातमी तुम्हाला कुठून समजली ते माहित नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणारे आमदार किंवा खासदार नाराज नाहीत. आमचा १० हजार टक्के एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. ज्या घडामोडी झाल्या आहेत त्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून विश्वासात घेऊन झालेल्या आहेत. मी ठामपणाने सांगू शकतो की लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती झाल्याने किंवा ते महायुतीमुळे आल्याने शिंदे गटात नाराजी आहे अशी काहीही चर्चाही झालेली नाही. कुणीही नाराज नाही” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

आमच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करत आहेत. राष्ट्रवादी महायुतीत आल्याने आमच्या मतदारसंघाचं काय होणार हा प्रश्न तीन नेते सोडवतील. महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणणं हे आमचं लक्ष्य आहे असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

शंभूराज देसाई काय म्हणाले?

आमच्याकडे २०० पेक्षा जास्त आमदार आहेत. ज्यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आमदार राहिले आहेत ते खोट्या बातम्या पसरवत आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. आगामी काळात सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत. असंही शंभूराज देसाईंनी बैठकीनंतर सांगितलं.