नगर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे जे वारसदार आहेत ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार नाहीत, बाळासाहेब ठाकरे यांना जीवनभर शिव्याशाप देणारे त्यांच्या पाठीमागे एकत्र आले, त्यांच्यावरही गोमूत्र शिंपडणे आवश्यक आहे, असा टोला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.  रेल्वेसंदर्भातील प्रश्नांसाठी केंद्रीय मंत्री दानवे यांनी गुरुवारी नगरमध्ये बैठक घेतली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे समर्थकांनी तेथे गोमूत्र शिंपडले. या कृतीकडे लक्ष वेधले असता, दानवे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली. या संदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले, की ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती नाहीत, त्यांचे कार्य माहिती नाही, त्यांच्या तोंडी टीका शोभत नाही. सावरकरांनी अकरा वर्ष काळय़ा पाण्याची शिक्षा भोगली. 