सत्तेत असलेले भारतीय जनता पक्षाचे मंत्री सरकारवरच टीका करत आहेत. त्यांची भूमिका अजून विरोधकांचीच आहे आणि आम्ही विरोधात असूनही कार्यकर्त्यांना अजूनही आम्ही सत्तेत असल्यासारखेच वाटत आहे, अशी टिपणी करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी सत्ताधारी आणि विरोधकांच्या कामगिरीचे मार्मिक विश्लेषण केले. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला, तर युती सरकारचा तो शेवटचा दिवस असेल, असेही ते म्हणाले.
शासनातील दोन-तीन मंत्र्यांची नावे घोटाळ्यात आली आहेत. त्यामुळे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी मागील सरकारच्या काळातील घोटाळ्यांच्या चौकशीचा मुद्दा पुढे केला जात असल्याचा आरोप पवारांनी केला.

Story img Loader