बुलढाणा : खामगाव शहरातील बालाजी प्लॉट परिसरातील सती ज्वेलर्स या दुकानातून एक लाख किमतीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. दोन इसमांनी दागिने खरेदीचा बनाव करत ही चोरी केली आहे. विशेष म्हणजे महिला दुकानदाराच्या उपस्थितीत ही चोरी झाली असून चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आदिमाया रेणुका मातेच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी

मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका सोन्याच्या दुकानात चोरी करण्यात आली. चोरट्यांनी साधारण एक लाख किमतीचे सोने या दुकानातून लांबवले आहे. महिला दुकानदाराला सोन्याचे आणखी दागिने दाखवा असे सांगून, संधी संधी मिळताच चोरट्यांनी दागिन्यांवर हात मारला आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून दुकानाच्या मालक तथा तक्रारदार निर्मला दिनेश वर्मा यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> खोके आणि राजवस्त्रे मिळालीत म्हणून गाडगेबाबांची दशसूत्री मंत्रालयातून हटवली का? – काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांचा सवाल

दरम्यान, खामगाव शहरात लूटमार, जबरी चोऱ्या, घरफोड्या याशिवाय इतर गुन्हे दररोज घडत आहेत. या शहरात अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये असताना गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief robbed 1 lakh rupees jewellery in buldhana police started investigation rno news prd