सोलापूर : वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटकात स्वतःच्या भावाला प्रवेश देण्याकरिता गेलेले कुटुंब परत येईपर्यंत त्यांचे घर चोरट्यांनी फोडून १७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा आठ लाख ५७ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. अकलूजमध्ये स्वरूप नगरात ही घरफोडी झाली.
याबाबत गौरव गजेंद्र पोळ यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार कापडाचे व्यापारी असलेले गौरव पोळ यांचे बंधू सुरज याचा कर्नाटकातील बसवकल्याण येथे एका आयुर्वेदिक महाविद्यालयात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला होता. त्यानुसार त्याला बसवकल्याणमध्ये संबंधित आयुर्वेदिक महाविद्यालयात सोडण्यासाठी गौरव पोळ हे घर बंद करून कुटुंबीयांसह गेले होते. रात्री परतल्यानंतर घर फोडण्यात आल्याचे दिसून आले.
हेही वाचा >>>“मनमोहन सिंग यांचं निधन व अंत्यसंस्कारांवरून काँग्रेस राजकारण करतेय”, भाजपाचा पलटवार
चोरट्यांनी पोळ यांच्या घराच्या गॅलरीत प्रवेश करून दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. एका खोलीतील कपाट फोडून त्यातील १७ तोळ्यांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आणि एक लाख ६५ हजारांची रोकड असा किमती ऐवज चोरट्यांनी लांबविला. अकलूज पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.