कराड: ओगलेवाडी (ता. कराड) येथील उद्योजक (कै.) वसंत दिनकर खाडे यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील तब्बल १०९.५० तोळे सोन्याचे दागिने व रोख दीड लाख रूपयांची रक्कम चोरटयांनी लांबवली. सोमवारी ही घटना उघडकीस आली. याबाबत प्रतीक वसंत खाडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, करवडी फाटा (ओगलेवाडी) येथील खरेदी- विक्री संघाच्या पाठीमागे ओढयाच्या कडेला उद्योजक (कै.) वसंत खाडे यांचा साई व्हिला बंगला आहे. येथेच त्यांचे वर्कशॉप व गारमेंट आहे. (कै.) खाडे यांचे  वर्षभरापूर्वी  निधन झाले असून, त्यांची पत्नी, मुलगा प्रतीक व सून असे साई व्हिला बंगल्यात वास्तव्यास आहेत. दिवाळीचा सण असल्याने ३१ ऑक्टोंबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान वर्कशॉप व गारमेंटमधील सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. केवळ रात्र व दिवसपाळीसाठी तीन पहारेकरी (वॉचमन) त्यांच्या शिफ्टनुसार कामावर हजर होते.

MLA Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Delhi Pregnant teen murder
Pregnant teen murder: गर्भवती प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; प्रियकरानं करवा चौथचा उपवास ठेवायला सांगितला आणि नंतर खड्डा खणून…
Maha Vikas Aghadi finalises seat sharing for Maharashtra
अखेर मविआचे ठरले! काँग्रेस १०५, ठाकरे ९५, शरद पवार ८५
Raj Thackeray on Code of Conduct
Raj Thackeray : “एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत…”, राज ठाकरेंनी सांगितली पूर्वीच्या आचारसंहितेच्या काळातील गंमत!
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Sharad Pawar on Manvat Murders Case
Video: ‘मानवत मर्डर’ माझी पहिली केस’ शरद पवारांनी उलगडला १९७२ चा थरार; पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णींबद्दल म्हणाले…

हेही वाचा >>>Raj Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात आहे राज ठाकरेंची बालमैत्रीण, म्हणाले, “आम्ही शिशूवर्गापासून…”

प्रतीक यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच दिवाळीचा सण असल्याने ते दोन नोहेंबर रोजी पाडव्याच्या दिवशी सकाळच्या सुमारास प्रतीक व त्यांच्या पत्नी असे दोघेजण पत्नीच्या माहेरी सांगली येथे गेले. त्याचदिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची आई हजारमाची (ता. कराड) येथील त्यांच्या माहेरी गेल्या. जाताना त्यांनी घराला कुलूप लाऊन घराची किल्ली घरकामासाठी येणाऱ्या व त्यांच्याच बंगल्यासमोरील जुन्या घरात वास्तव्यास असलेल्या महिलेकडे दिली.

दरम्यान, सोमवारी सकाळी वॉचमन बंगल्याच्या परिसरातील लाईट बंद करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना वरच्या मजल्यावरील दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बंगल्यात चोरीचा प्रकार घडल्याचे समोर आले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र फिरवली. ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.

हेही वाचा >>>Sharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद पोंक्षेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका

बंगल्याच्या समोर असलेल्या केबिनमध्ये रात्रपाळीचा वॉचमन हजार होता. तर चोरटयांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या खिडकी व बाल्कनीच्या रेलींगला दोन दोऱ्या बांधल्याचे आढळून आले आहे. याच दोऱ्यांवरून चोरटयांनी वर चढून खिडकीचा गज कापून व दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील कपाट उचकटून कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १०९.५० तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रूपयांची रोख रक्कम लंपास केली. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैद

बंगल्याच्या संपुर्ण आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. चोरी करण्यासाठी आलेले दोन इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. काल तीन नोव्हेंबरला पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम घरात घूसल्याचे दिसत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या इसमांनी कॅमेरावर कापड टाकले.