नितीन बोंबाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्या पाटबंधारे खात्याने कोटय़ावधी रुपये खर्चून १९८० साली बांधलेल्या कवडास उन्नयी बंधारालगतचे बालोउद्यानाची देखभाल दुरुस्तीअभावी रया गेली आहे. डहाणूतच  नव्हे, तर जिल्ह्यत पथदर्शी ठरणारा हा प्रकल्प  दुर्लक्षामुळे  निरुपयोगी ठरण्याच्या मार्गावर आहे.

कवडास उन्नयी बंधाऱ्यासाठी पाटबंधारे खात्याकडून सुरक्षा रक्षक नेमलेला आहे. मात्र एक सुरक्षा रक्षक बालोद्यन आणि बंधारा या दोन्ही ठिकाणी लक्ष देणे शक्य नाही. कवडास येथे काहींना मध्ये न सोडल्यास बाचाबाचीे प्रकार घडतात.परिणामी सुरक्षा रक्षक एकटाच पडतो. भंगार चोरांना रोखल्यास सुरक्षा रक्षकावर हल्ला होण्याची भिती असते. पाटबंधारे खात्यात अनेक वर्षांपासून शिपायी सुरक्षा रक्षकांची भरती केलेली नाही. सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली पदे भरली गेली नाहीत.

पर्यावरण, संस्कृती, मनोरंजन यांचा मेळ घालून सूर्यनगर कवडास उन्नायी बंधाऱ्यालगत असलेल्या कालव्या पट्टय़ात सुमारे  २०  एकर जागेत  उद्यान उभारण्यात आले. कृत्रिम धबधबे, आकर्षक प्रतिमा , पक्षी, प्राणी यांची रेलचेल, तसेच विविध जातीच्या वृक्षांची, फुलझाडांची लागवड या उद्यानाची वैशिष्टय़े होती.

फवारे , लुकलुकणाऱ्या दिव्यांमुळे  पर्यटकांना मोठी पर्वणी होती. उद्यानात कडुनिंब, आंबा, काजू, खजूर, अशोक माड या झाडांची लागवड या विभागात करण्यात आली. तसेच  फुलझाडे, वेली, कदंब, शंकासूर, करदळी अशी झाडे आहेत. फुलांचे ताटवे, नारळबाग, बांबू, कृष्णकमळ लावले गेले. मात्र  त्याकडे लक्ष दिले नाही.

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर डेब्रिज टाकले जात आहे. संरक्षक भिंतीचे प्रवेशद्वार आणि लोखंडाची चोरी झाली आहे. पाण्याचे कुंड आणि पाटाच्या बांधकामातील विटा चोरण्यासाठी बांधकामे तोडण्यात आल्याचे कृष्णा वावरे  यांनी सांगितले.