निजामुद्दीन दिल्ली (मरकज) येथून चंद्रपूरमध्ये दाखल झालेल्या ११ विदेशी व २ परप्रांतीय अशा एकूण १३ नागरिकांना शहर पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यात झपाट्याने करोना विषाणूचा संसर्ग सुरू असतांनाच निजामुद्दीन दिल्ली येथून चंद्रपूरात दाखल झालेले ११ विदेशी नागरिक हे पर्यटन व्हिसा घेवून व २ भारतीय परराज्यातील नागरिक चंद्रपूर येथील छोटी मशिदमध्ये आले होते.

चंद्रपूर येथे आल्यानंतर विदेशी नागरिकांनी जिल्ह्यातील इतर ठिकाणी प्रवास करून व्हिसा व प्रशासकीय नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरूध्द चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यानंतर या सर्व १३ नागरिकांना येथील वन अकादमी व वसंत भवन येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर या सर्व ११ विदेशी व २ परराज्यातील भारतीय नागरिकांना त्यांचे विरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्याच्या आधारावर आज शहर पोलिसांनी अटक केली.

या सर्व १३ नागरिकांना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयने त्यांचा न्यायालयीन रिमांड मंजूर केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिस करित आहेत.