महाराष्ट्रातलं महायुती सरकार हे खोके सरकार आहे. डबल इंजिन सरकार आहे. महागळती सरकार आहे. या सरकारच्या निरोपाचं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. सगळी जनता यांना बाय बाय सरकार म्हणते आहे अशी टोलेबाजी करत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्रात उद्या गाजर संकल्प

अर्थसंकल्पाबद्दलही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. घोषणांचा पाऊस पडेल. मात्र तो गाजर संकल्प असणार आहे. निधी खर्चच होणार नाही. घोषणा खूप झाल्यात. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो हे मी कायमच म्हणत असतो. या सरकारमध्ये हिंमत असेल तर गेल्या दोन वर्षातील घोषणांची किती पूर्तता झाली हे खरेपणाने सांगितलं पाहिजे. एवढंच नाही तर त्यासंबंधीची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. ही श्वेतपत्रिका जर या सरकारने काढली तर तो एक कोरा कागद असेल असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Aaditya Thackeray alleged Sanjay Gupta
Aaditya Thackeray : “हे लज्जास्पद आहे”, शिवसेनेच्या तोतया प्रवक्त्यावर संतापले आदित्य ठाकरे; करणार कायदेशीर कारवाई
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, भाषणात म्हणाले; “यावेळी मला सूड…”
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”

लाज, लज्जा, शरम नसलेलं सरकार

या सरकारला खोके सरकार, महायुती सरकार म्हणतात. पण केंद्र आणि राज्याचं डबल इंजिन सरकार म्हणजे महागळती सरकार आहे. हे लिकेज सरकार आहे. कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती झाली आहे. पेपरही फुटत आहेत. तरीही यांना लाज, लज्जा, शरम वाटत नाही. आम्ही प्रश्न मांडले की आमच्यावर आरोप होत आहेत. आमच्याकडून काही प्रश्न उपस्थित केले जातीलच. मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे ती आपल्याच माध्यमांतून आम्हाला समजतं आहे. राज्यातले शेतकरी ही परिस्थिती भोगत आहेत. सरासरी रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करतो आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना या खोके सरकारने लवकरात लवकर कर्जमुक्त केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंची टोलेबाजी, “एकनाथ शिंदे यांची शेती पंचतारांकित! अमावस्या, पौर्णिमेला…”

शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे

शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. एक रुपयात पीक विम्याची घोषणा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र काही शेतकऱ्यांच्या हातात फक्त ७० रुपये आले आहेत. शेपटावर निभावलं. कसंबसं एनडीए सरकार आलं. डबल इंजिन सरकारने पीक कर्जमुक्ती लगेच द्यावी. मी दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची रक्कम माफी दिली होती. घोषणा आणि थापा मारू नका. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून निवडणुकीच्या आत कर्जमुक्ती द्यावी. फडणवीस यांनी एक कर्जमुक्ती केली. तिची अंमलबजावणी अजून नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

‘लाडकी बहीण’प्रमाणेच ‘लाडका भाऊ’ योजनाही आणा

डबल इंजिन सरकारने केंद्रातल्या सरकारची मदत घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे. लाडकी बहीण प्रमाणे लाडका भाऊ अशीही योजना आणा. या योजनेत स्त्री आणि पुरुष भेद करु नका. कर्ता पुरुष असतो तसं अनेक घरांमध्ये कर्ती महिलाही असते. चंद्रकांत पाटील आज मला चॉकलेट देऊन गेले. तसंच मोफत शिक्षणाचंही चॉकलेट दिलं होतं ती योजना पोकळ ठरली आहे. आता लोकांची सहनशक्ती संपली आहे. गाजर दाखवून तुमचं काम होणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Story img Loader