महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये विविध मुद्य्यांवरून मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. यामध्ये प्रामुख्याने राज्यपाला भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उचलून धरण्यात आला असून, भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका सुरू आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ हटवलं जावं, अशीही जोरदार मागणी सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.

हेही वाचा – “ज्यांना हात दाखवायचा होता त्यांना आम्ही ३० जूनलाच दाखवला”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टीकाकारांना प्रत्युत्तर!

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Raj Thackeray in ghatkopar
Raj Thackeray in Ghatkopar : “नालायक ठरलो तर…”, राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन; म्हणाले, “सत्ता नसताना…”

उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या सर्वांना आठवतयं की काही दिवसांपूर्वी आपण इथेच भेटलो होतो तेव्हा, कोश्यारींनी मुंबई, ठाणे परिसरातील मराठी माणसांचा अपमान केला होता आणि तेव्हा मी म्हणालो होतो की यांना आता कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतरही हे महोदय थांबले नाहीत त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा ते जुन्या काळातील आदर्श असं म्हणाले. यावर आमचे कोल्हापुरचे जिल्हाध्यक्ष चांगलं बोलले आहेत, की बाप हा बाप असतो तो जुना आणि नवा कसा काय म्हणणार तुम्ही?, त्यामुळे आदर्श हा आमचा आहेच, ते आमचं दैवत आहे. हळूहळू मला असं वाटतय की ही जी काही शक्कल आहे ती केवळ या राज्यपालांच्या काळी टोपीतून आलेली नाही. त्यामागे कोण आहे, या सडक्या मेंदुच्या मागील मेंदू कोण आहे? हे सुद्धा शोध घेण्याची वेळ आलेली आहे.”

नक्की पाहा – PHOTOS : छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक, म्हणाले…

याशिवाय, “कारण, हळुवारपणाने महाराष्ट्रातील आदर्शांचा अपमान करायचा, सावित्रीबाई फुलेंबद्दलही हे असंच बोलले होते. पण आपण तेव्हा जाऊद्या असं होतं कधीकधी असं म्हटलं. परंतु सातत्याने अपमान करत राहायचा आणि हळुवारपणे महाराष्ट्राच्या मनातले, महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेले, आदर्श पुसून टाकून मग आपलीच जी भाकडं म्हणजे त्यांची नेते मंडळी आहेत, त्यांची आदर्श म्हणून एक प्रतिमा लोकांच्या मनात ठसवण्याची ही त्यांची जी काय वृत्ती आहे, चाल आहे हिचा आम्ही निषेध तर केलेलाच आहे. गावोगावी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले आहेत, मी तर पाहीलं कुणीतरी एक धोतरही जाळलं, या सगळ्या गोष्टी झाल्या आता हे महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळत आहेत.” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

हेही वाचा – “ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का?”; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल!

याचबरोबर, “महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेले. महाराष्ट्राचं मंत्रीमंडळ, काल तर मी ऐकलं की कॅबिनेट बैठक ही अपवादात्मक परिस्थिती पुढे ढकलल्या जाते, तशी काल काय अपवादात्मक परिस्थती होती? तर अपवादात्मक परिस्थिती ही की यांचे बरेचसे लोकं हे गुजरातमध्ये प्रचाराला गेले. म्हणजे यांना महाराष्ट्र उघड्यावर पडला त्याची खंत नाही, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, दैवताचा अपमान होतोय त्याची खंत नाही. मग काहीतरी गोलमाल उत्तर द्यायचं आणि वेळ मारून न्यायची त्यात आणखी भर ज्या विचारसरणीची व्यक्ती मी म्हणालो, त्याच विचारसरणीचे म्हणजे भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेंदींना एक उबळ आली. तेही काहीतरी बोलले आहेत. म्हणेज आता पक्षाबद्दल बोलावं की विचारसरणीबद्दल बोलावं, हा शोध तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे.” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.