उद्धव ठाकरे २२ जानेवारीपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. महाआरती केली. तसंच, नाशिकमधील जनतेशी संवाद साधला. तर, आज २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंनी राज्यव्यापी अधिवेशनात संवाद साधला. तसंच, त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “लबाड लांडग्यांने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचे काळीज लागते. वाघ एकच तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल (२२ जानेवारी) काळाराम मंदिरात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा पोषाख केला होता. भगव्या रंगाचा कुर्ता, पांढरा पायजमा आणि गळ्यात माळा घातल्या होत्या. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. यावरून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांसारखे भगवे कपडे आणि रुद्राक्षांच्या माळा घातल्या म्हणजे कुणाला बाळासाहेब होता येणार नाही. त्यासाठी बाळासाहेबांसारखे प्रखर विचार असावे लागतात.

तसंच, ही घराणेशाही आहे. पण ती वडिलोपार्जित घराणेशाही आहे. आम्ही ३० वर्षांत भाजपवाले झालो नाहीत, मग काँग्रेसवासी कसे होऊ असा सवाल ठाकरेंनी विचारला होता. त्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेसच्या ताटाखालील मांजर होऊन सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी मिंधेपणा करणारे सर्वात मोठे मिंधे कोण..? ये पब्लिक है सब जानती है !

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those who are squeamish for the post of chief minister chief minister eknath shinde hits back at thackeray sgk