महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श होते, असं विधान केलं. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केली. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच पार्श्वभूमीवर सोलापुरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राज्यपालांच्या प्रतिमेला काळं फासत “राज्यपालाला पकडा… राज्यपालाला पकडा” अशा घोषणाही देण्यात आल्या.

हेही वाचा- “छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली” भाजपा नेत्याचं मोठं विधान, आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, सोलापुरचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला. यावेळी बरडे म्हणाले, “महाराष्ट्रातील अत्यंत हीन वृत्तीचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आतापर्यंत चारवेळा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले आहेत. शिवाजीमहाराज हे केवळ हिंदुंचे नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जाती-धर्मातील लोकांचे दैवत आहेत. त्यामुळे या राज्यपालाला ताबोडतोब केंद्राने परत बोलवावं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शिवाजी महाराजांबद्दल खरोखर प्रेम असेल तर त्यांनी ताबोडतोब याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला पाठवावा” अशी मागणी बरडे यांनी केली.

हेही वाचा- “राज्यपालांचं वय झालंय, आता त्यांना…” शिवरायांबद्दल केलेल्या विधानावरून वसंत मोरेंची खोचक टीका!

“भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी या माणसानं सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच पत्रे लिहिली होती. त्यांनी इतिहासात असं एक पत्र तरी दाखवावं” असं आव्हान बरडे यांनी दिलं. शिवाय जो कोणी कोश्यारींचं धोतर फेडेल त्याला सोलापूर जिल्हा शिवसेनेतर्फे एक लाख ५१ हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणानी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those who uncloth dhotar of governor bhagatsingh koshyari will get one and half lac protest thackeray group in solapur rmm