सांगलीत नदी महोत्सवास सांगता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : दिव्यांनी कृष्णाकाठावरील माई घाट गुरुवारी रात्री उजळून गेला. गेले आठ दिवस नदी महोत्सवाअंतर्गत जलसंपदा विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या महोत्सवाची दीपोत्सवाने सांगता करण्यात आली. कृष्णा नदी उत्सवाच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मििलद नाईक व कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, सचिन पवार, सूर्यकांत नलवडे, अभिनंदन हरुगडे, राजन डवरी, महेश रासनकर, अधीक्षक जालिंदर महाडीक व जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सांगलीकर नागरिक उपस्थित होते.

 कृष्णा काठी माईघाटावर सूर्यास्तानंतर नयनरम्य अशा दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ५ हजार दिव्यांची मनमोहक अशी आरास करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अशी अक्षरे व माई घाटाचा परिसर दिव्यांनी उजळून निघाला. लहान मुलांच्या हस्ते तिरंगा रंगातील फुगे आकाशात सोडण्यात आले. यानंतर कृष्णा माईचे पाणी पूजन करून महाआरती करण्यात आली.

कृष्णा नदी उत्सवांतर्गत सर्व घाटाची स्वच्छता मोहूम राबविण्यात आली. तसेच माई घाट येथे  देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन, निसर्ग व पर्यावरण, वृक्षारोपण व मुलांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भजन, भक्तिगीत, भावगीत व गीतरामायण अशा सुगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands lamps lit krishna ghat ysh