सांगली : मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील पाणी प्रदूषित झाल्याने हजारो मासे मृत झाले असून, तलाव सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांना साकडे घालण्यात येईल, असे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आंदोलकांना आश्वस्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला

मिरजेतील गणेश तलावात गेल्या दोन दिवसांपासून मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत आहेत. पाण्यातील प्राणवायुचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पाण्याला उपसाच नसल्याने ही स्थिती निर्माण होत असली तरी महापालिकेने पाण्यातील प्राणवायुचे प्रमाण स्थिर राहावे यासाठी कारंजा केला असला तरी तो बहुतांशी वेळा बंद राहत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. तलावातील मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असल्याने सभोवती वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तलावाच्या ठिकाणी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत प्रदेशाध्यक्ष श्री. कदम यांनी भेट देऊन पाहणी करत ऐतिहासिक तलावाचे सुशोभीकरण करून या ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व पर्यटनमंत्री देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर निधी मंजूर करण्याचे प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands of fish die due to polluted water in historic ganesh lake in miraj zws