नगराध्यक्षपदासाठी वाईत तीन तर पाचगणीतही तिघांनी अर्ज दाखल केले. पालिकांच्या अध्यक्षपदाची सोमवारी(१४ जुलै) रोजी निवडणूक होत आहे.
आज दुपारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या वेळेत वाईत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद कोळी व मुख्याधिकारी आशा राऊत यांच्याकडे सत्ताधारी तीर्थक्षेत्र आघाडीकडून भूषण गायकवाड तर विरोधी जनकल्याण आघाडीकडून नंदकुमार खामकर व शोभा िशदे यांनी अमेदवारी अर्ज दाखल केले. वाईत तीर्थक्षेत्र आघाडीचे नऊ सदस्य आहेत. त्यांना अपक्ष नगराध्यक्षा नीलिमा खरात व त्यांचे पती दत्तात्रय खरात यांनी पाठिंबा दिला होता. जनकलयाण आघाडीचे आठ सदस्य आहेत. तीनही उमेदवारांनी आज पालिकेत सहकारी नगरसेवकांसह जाऊन अर्ज दाखल केले. तत्पूर्वी सत्ताधारी आघाडीची आमदार मकरंद पाटील, संजय लोळे, शशिकांत पिसाळ यांच्या उपस्थितीत बठक झाली. त्यावेळी अनिल सावंत, भूषण गायकवाड, दत्तात्रय खरात व सीमा नायकवडी यांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर नितीन पाटील यांनी भूषण गायकवाड यांना अर्ज भरण्यास सांगितले. मात्र गायकवाडांच्या उमेदवारीला बहुसंख्य नगरसेवकांनी विरोध दर्शविला असून ही नाराजी पाटील कशी दूर करतात त्यावर सत्ताघारी सत्ता टिकविण्यात यशस्वी होतील.
पाचगणी येथे नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्यासह विरोधी गटातून महेश दिनेश चौरासिया व उज्वला नीलेश महाडीक यांनी मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्याकडे अर्ज दाखल केले. सत्ताधारी आणि विरोधी गटाकडे आठ आठ असे समसमान सदस्य आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच सुलभा लोखंडे यांना अपात्र ठरविले आहे. त्या या निर्णयावर मुबई उच्च न्यायालयात गेल्या आहेत. त्यांच्या अर्जावरही सुनावणी सुरू आहे. मकरंद पाटील यांनी पाचगणीची सत्ता खेचून आणण्याचा निर्धार केला आहे. या निवडणुकीमुळे वाई, पाचगणी, महाबळेश्वरचे राजकीय वातावरण तापले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा