आंध्र प्रदेशातून विक्रीसाठी आणलेला १४ लाख  ६५ हजाराचा ८६  किलो गांजा उमदी पोलीसांनी स्विप्ट मोटारीचा पाठलाग करून पकडला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून गांजा पुरवठादार व खरेदीदारांसह पाच जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. आंध्र प्रदेशातून स्विप्ट डिझायर मोटारीतून (एमएच १३ एझेड १३७१) गांजा विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती उमदी पोलीसांना मिळाली. या माहितीनुसार अमोघसिध्द मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर सहायक निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने सापळा लावला. यावेळी मोटारीच्या डिकीमधून एक पोते काढून घेत असताना  इफतेखारूल उर्फ अरबाज बाबासाहेब  शेख (वय  २६  रा.राजूनगर, जुना कुपवाड रोड) याला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा >>> कोकणात जाण्यासाठी हमखास वापरात असलेल्या पाली-वाकण रस्त्याला तडे

Protest In Shimla Against Alleged Illegal Construction Of Mosque
हिमाचल प्रदेशात मशिदीतील अवैध बांधकामांबाबत निदर्शने ; आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई
diverting surplus water from ulhas and vaitrana sub basins godavari basin in Marathwada
बदलापूरः उल्हासचे प्रदुषित पाणी मराठवाड्याला नेणार का ? पर्यावरणप्रेमींचा सवाल, उल्हास, वैतरणाचे पाणी मराठवाड्यात नेण्याच्या निर्णयावर नाराजी
Pooja Khedkar in delhi high court
Pooja Khedkar : “मी AIIMS मध्ये जाण्यास तयार”, बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकर यांची दिल्ली उच्चन्यायालयात विनंती!
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Pune, Khadki, stabbing, sword attack, innkeeper, enmity, arrested, minor detained, attempted murder, police investigation, crime news
पुणे : वैमनस्यातून सराइतांकडून तरुणावर तलवारीने वार, खडकी परिसरातील घटना
minorities targeted in bjp ruled states deeply troubling congress slams bulldozer action in mp
बुलडोझर न्याय अमान्य! अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे व्यथित करणारे; घरे पाडणे थांबवण्याची काँग्रेसची मागणी

याचवेळी मोटारीत समोर बसलेल्या दोघांनी मोटारीसह सोलापूर महामार्गावरून चडचणच्या दिशेने पलायन केले. ही मोटारी इचगाव पथकर नाक्यावर अडवून झडती घेतली असता  यामध्ये पोत्यामध्ये भरण्यात आलेला सुका गांजा आढळला. त्याचे वजन  ८६  किलो  ३०५  ग्रॅम असून त्याचे मूल्य  १४  लाख  ६७  हजार ८३५ रु.  आहे. मोटारीतून पलायनाच्या प्रयत्नात असलेले प्रतिक कांबळे (वय  २६  रा. नागराळे, ता. पलूस) आणि  मोहसीन मेहबूब कागजी (वय   २८ रा. शंभरफुटी  सांगली) आणि शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> “आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, पण…”, भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान

गांजा विक्रीसाठी आंध्रप्रदेशातून प्रकाश भाई (रा. राजमंद्री, आंध्र प्रदेश) याच्याकडून आणण्यात आला असल्याचे अटक केलेल्या तिघांनी सांगितले. तर गांजाची खरेदी करणारा पिंटू माळी हा सांगलीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीसांनी अटक करण्यात आलेल्या तिघासह पाच जणाविरूध्द उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उमदी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंंदे, उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, शिरीष शिंदे, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, नितीन पलुसकर, आप्पासाहेब हाके, महादेव मडसनाळ, मनिष कुमरे, इंद्रजित गोदे, सोमनाथ पोटभरे, अमोल पाटील, सोपान भंडे, वहिदा मुजावर, समिक्षा म्हेत्रे आदींनी केली.