वाई : वाघाचे कातडे विकणाऱ्या महाबळेश्वरच्या तिघांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. बोरीवली येथील एलआयसी मैदान परिसरात वाघाचे कातडे आणि वाघ नखे विकणाऱ्या तिघांचा यात समावेश आहे. त्यांच्याकडून ११४ सेमी लांब १०८ सेमी रुंद आणि बारा वाघ नखे असा दहा लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वन्यजीव कायदानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संदीप आनंदराव परीट यांनी फिर्याद दिली असून, सुरज लक्ष्मण कारंडे (वय ३०, रा. बिरवाडी ता. महाबळेश्वर) मोहसीन नजीर जुंद्रे (वय ३५, रा. रांजणवाडी महाबळेश्वर) व मंजूर मुस्तफा मानकर (वय ३६ रा. नगरपालिका सोसायटी महाबळेश्वर ) अशी संबंधित आरोपींची नावे आहेत.पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बॉम्बे यांना महाबळेश्वर येथील काही लोक वाघाचे कातडे एलआयसी मैदान परिसरात विकायला येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस उपायुक्त अजयकुमार बंसल यांच्या सूचनेनुसार मैदान परिसरात सापळा रचण्यात आला आणि तिघांनाही पकडण्यात आले. त्यांच्याकडून वाघाची कातडे आणि नखे जप्त करण्यात आली. वाघ नखे आणि वाघाची कातडे असा दहा लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, अखिलेश बॉम्बे, प्रवीण चोपडे, संदीप परीट, प्रशांत ठोंबरे, गणेश शेरमाळे यांनी या कारवाईत भाग घेतला होता. या प्रकरणाची सातारा वनविभागाला कोणतीही माहिती नव्हती असे समोर आले आहे. आदिती भारद्वाज यांना याबाबत संपर्क साधला असता या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील कारवाईची दिशा निश्चित करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.