सोलापूर : मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगारीसाठी बेकायदेशीरपणे स्थिरावलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना सोलापूरच्या दहशतवादविरोधी पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चंचल विष्णुदेव उर्फ विश्वनाथ रॉय (वय २९, रा. बेनीपूर, बांगला देश), रजा हुजूरअली हुसेन (वय ३८, रा. कटला, बांगला देश) आणि मीनल शनिचेरा (वय ३०, रा. फुलोनी, बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा बांगलादेशींची नावे आहेत. त्यांच्याकडे भारत देशात रहिवास करण्याचा कायदेशीर पासपोर्ट आणि व्हिसा नाही. मात्र त्यांच्याकडे आधारकार्ड आढळून आले.
हेही वाचा >>>“मनमोहन सिंग यांचं निधन व अंत्यसंस्कारांवरून काँग्रेस राजकारण करतेय”, भाजपाचा पलटवार
सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काही बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याची माहिती सोलापूरच्या दहशतवादविरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. या पथकाचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिंचोली औद्योगिक वसाहत परिसरात तळ ठोकला होता. मोहोळ पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली. काही कंपन्यांमध्ये कामगारांच्या खोल्यांची तपासणी करण्यात आली. यात बांगलादेशी तरुण बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले.
या तरुणांची चौकशी केली असता त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा आढळून आला नाही. मात्र त्यांच्या नावे असलेले आधारकार्ड आढळून आले. त्याबाबत विचारणा केली असता एका एजंटामार्फत आधारकार्ड तयार करून घेतल्याची माहिती पुढे आली. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गोपाळ साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिन्ही बांगलादेशी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. हे तुम्ही बांगलादेशी तरुण बेकायदेशीरपणे भारतात कसे आले? मोहोळ औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांना कोणी आणि कसे कामावर लावले? त्यांचा सूत्रधार कोण, याचा छडा पोलीस लावत आहेत.