पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून नालेगाव भागातील तीन तरुणांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिद्धीबागेलगतच्या पोलिस मुख्यालयाच्या गेटसमोरच सकाळी साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.
यासंदर्भात सुपा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामेश्वर तुरणहार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोरक्ष बाळासाहेब खंडागळे, त्याचा भाऊ अजय व नितीश राजू घोडके (तिघेही रा. नालेगाव) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.
तुरणहार व त्यांचे पारनेर पोलिस ठाण्यातील दोघे सहकारी उपनिरीक्षक असे तिघे, मुख्यालयातील कवायत संपवून मोटारसायकलवरून घरी परतत होते. तिघे आरोपी मोटारसायकलवरून त्यांना कट मारून गेले. तुरणहार यांनी गाडी नीट चालवा, असे सांगितले असता, तिघांनी उर्मटपणे गाडी आडवी लावून रस्ता तुमच्या बापाचा आहे का असे म्हणत मारहाण सुरू केली, तुरणहार यांनी पोलिस खात्यातील ओळखपत्र दाखवले असता, तुम्ही येथे नोकरी कशी करता, असे म्हणत दमदाटी केली.
फौजदाराला तिघांकडून मारहाण
पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून नालेगाव भागातील तीन तरुणांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
First published on: 14-05-2014 at 03:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three beaten to police inspector