पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून नालेगाव भागातील तीन तरुणांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिद्धीबागेलगतच्या पोलिस मुख्यालयाच्या गेटसमोरच सकाळी साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.
यासंदर्भात सुपा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामेश्वर तुरणहार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोरक्ष बाळासाहेब खंडागळे, त्याचा भाऊ अजय व नितीश राजू घोडके (तिघेही रा. नालेगाव) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.
तुरणहार व त्यांचे पारनेर पोलिस ठाण्यातील दोघे सहकारी उपनिरीक्षक असे तिघे, मुख्यालयातील कवायत संपवून मोटारसायकलवरून घरी परतत होते. तिघे आरोपी मोटारसायकलवरून त्यांना कट मारून गेले. तुरणहार यांनी गाडी नीट चालवा, असे सांगितले असता, तिघांनी उर्मटपणे गाडी आडवी लावून रस्ता तुमच्या बापाचा आहे का असे म्हणत मारहाण सुरू केली, तुरणहार यांनी पोलिस खात्यातील ओळखपत्र दाखवले असता, तुम्ही येथे नोकरी कशी करता, असे म्हणत दमदाटी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा