कर्जत : प्रजासत्ताक दिन शिबिर ( आर.डी. कॅम्प) करिता कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या सर्वाधिक तीन छात्र सैनिकाची निवड झाली आहे. अहिल्या नगर जिल्ह्यामधील एकमेव आशा कर्जत तालुक्याला ही संधी मिळाली आहे.
दादा पाटील महाविद्यालयाची गौरवमय परंपरा कायम
रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील एन सी सी विभागातील सर्वाधिक तीन छत्र सैनिकांची निवड महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय पातळीवर झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली.
दिल्ली येथे सुरू असलेल्या आरडी कॅम्प मध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या छात्र सैनिकांमध्ये अंडर ऑफिसर प्रणव काळे, अंडर ऑफिसर भूषण राणेरजपूत, अंडर ऑफिसर ओम शेटे या तीन छत्र सैनिकांची निवड झाली असून ते सध्या दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन शिबिरा लष्करी कवायत, ड्रिल ,सांस्कृतिक कार्यक्रम, फ्लॅग एरिया, लाईन एरिया, शस्त्र कवायत वैयक्तिक शिस्त, टाप टीपपणा, बौद्धिक क्षमतेचा सराव करत आहेत . सदर छात्र सैनिकांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, पंतप्रधान, भारताचे लष्कर प्रमुख, नौसेना अध्यक्ष, वायुसेना अध्यक्ष ,थलसेना अध्यक्ष, संरक्षण राज्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री, यांना मानवंदना व भेट देण्याची संधी प्राप्त होत आहे. तसेच पंतप्रधान रॅलीमध्ये हे छात्र सैनिक सहभाग ही होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामधील १७ महाराष्ट्र बटालियन मधून निवड झालेले सर्वाधिक छात्र सैनिक व एकमेव महाविद्यालय आहे. या शिबिराची सांगता मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल करणार आहेत.
तसेच मुंबई दर्शन, आग्रा दर्शन, दिल्ली दर्शन करण्याचा लाभ छात्र सैनिकांना मिळणार आहे.या छात्र सैनिकांना मेजर डॉ. संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष बाब म्हणजे आज पर्यंत दादा पाटील महाविद्यालयाच्या शंभर छात्र सैनिकांची निवड प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी मेजर डॉ. संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे झालेली आहे.
छात्र सैनिकांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, दादाभाऊ कळमकर, आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके ,अंबादास पिसाळ , बाप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर ,प्राचार्य डॉ. संजय नगरकर, १७ महाराष्ट्र बटालियन प्रमुख कर्नल प्रसाद मिझार तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी छात्र सेनिकांचे अभिनंदन केले आहे.