सातारा तालुक्यातील आसगाव येथे तीन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. त्यापकी दोघे सख्खे तर तिसरा त्यांचा चुलत भाऊ होता.
या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे- आसगाव येथील इयत्ता चौथीत शिकणारे अमोल भीमराव कांबळे (वय १०)आणि धीरज राहुल कांबळे (वय १०) हे दोघे शाळेच्या मधल्या सुटीनंतर गावातील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले. पाझर तलावात ते दोघे बुडत आहेत असे अमोलचा भाऊ तेजस (वय १२) याला दिसले. त्याने या दोघांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यात तोही पाण्यात बुडू लागला. या वेळी अभिषेक कांबळे याने ही घटना शाळेच्या शिक्षकांना तसेच गावातील युवकांना सांगितली. तातडीने त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले आणि सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेने आसगाव हादरून गेले आहे. गावावर शोककळा पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा