महाराष्ट्रातील तीन चिमुकल्यांनी कमालच केली आहे. अवघ्या चौथ्या आणि सातव्या वर्षी या मुलांनी माथेरान डोंगररांगांमध्ये असलेला ‘मलंग’गड सर केला आहे. सह्याद्री रॉक एडव्हेंचर गिर्यारोहक समूहाच्या सहकार्याने त्यांनी हा पराक्रम करून दाखवला आहे. ओम ढाकणे, परिणीती लिंगे आणि अवंती गायकवाड अशी या मुलांची नावे आहे. यापैकी ओम अवघ्या चार वर्षांचा आहे. तर परिणीती आणि अवंती या सात वर्षाच्या आहेत. लहान मुलांमध्ये महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांबाबत जनजागृती व्हावी, त्यांची माहिती त्यांना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम केल्याचे भूषण पवार यांनी सांगितले. या चिमुकल्यांनी पराक्रम करत गड कसा सर केला ते पाहुयात व्हिडीओच्या माध्यमातून.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader