नाशिक, नंदुरबार, मुंबई, नागपूर : मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात तिघांचा मृत्यू झाला. तर गुजरातमध्ये चार जण दगावले. बंदी असतानाही याचा वापर केल्याने राज्यात आठ जण जखमी झाले. त्यात उत्तर महाराष्ट्रातील सात तर नागपूरमध्ये कर्तव्यावर जात असलेल्या महिला पोलीस जखमी झाल्या.

मुंबईत बेकायदा नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. त्यात १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Ajit Pawar on Walmik Karad
Ajit Pawar on Walmik Karad: वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींना…”
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?

सक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा आहे. मात्र यात नायलॉन मांजाचा वापर आता जीवावर उठत आहे. मंगळवारी त्याचा फटका पक्षांनाही बसला. नायलॉन मांजा गळ्याला कापल्याने नाशिक आणि नंदुरबार, अकोला जिल्ह्यात एक बळी गेला. नंदुरबारमध्ये सात वर्षांचा कार्तिक गोरवे हा आजोबांबरोबर दुचाकीने जात असताना मांजामुळे गळा चिरला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर नाशिकमध्ये सोनू धोत्रे या २३ वर्षीय दुचाकीस्वाराचा बळी गेला. सोनू हा सणासाठी गुजरातहून आला होते. मे महिन्यात त्याचा विवाह होणार होता. विदर्भातील अकोला शहरात दुचाकीस्वार किरण प्रकाश सोनोने यांच्या गळ्याभोवती मांजा अडल्याने ते मृत्यूमुखी पडले.

हेही वाचा >>> तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त

मुंबईत पोलिसांची मोहिम

मुंबई पोलिसांनी १० ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत बेकायदेशीर नायलॉन मांजाच्या वापराबाबत विशेष मोहीम राबवली. त्या मोहिमेदरम्यान १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कारवाईत १९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे अथवा नोटीस देण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर व्यापारात सहभागी असलेल्या इतर आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

गुजरातमध्ये चौघांचा मृत्यू

अहमदाबाद: गुजरातमध्ये मांजाने चार जणांना मृत्यू झाला. राजकोट, पंचमहल, मेहसाणा तसेच सुरेंद्रनगर जिल्ह्यात प्रत्येकी एक जण दगावला. पंचमहल जिल्ह्यात हलोल शहरात कुनाल परमार (वय ४) हा बालक वडिलांबरोबर दुचाकीवरून जात असताना मांजा गळ्यात अडकडून मृत्यू झाला. मेहसाणा जिल्ह्यात मनसाजी ठाकोर हे दुचाकीवरून शेतात असताना मांजा गळ्याभोवती अडकून मृत्यू झाला. नायलॉन मांजावर बंदी असतानाही त्याचा वापर केला जात आहे.

Story img Loader