अलिबाग- रायगड जिल्ह्यात शाळेच्या बसला दुचाकीने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला. खोपोली पाली  राष्ट्रीय महामार्गावर दुपारी ही दुर्घटना घडली. मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. श्रीराज एज्युकेशनल सेंटरची स्कूल बस विद्यार्थ्यांघेऊन निघाली होती. यावेळी परळीच्या पुढे एका वळणावर हा अपघात झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भरधाव वेगाने येणारी दुचाकी एका कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या शाळेच्या बसवर जोरात आदळली. यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला होता.

एक जण गंभीररीत्या जखमी सल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला तातडीने जांभुळपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र त्यापूर्वी त्याचाही मृत्यू झाला होता. अपघातात दगावलेल्या तिन्ही दुचाकीस्वारांची अद्याप ओळख पटलेली नाही. खोपोली आणि पाली पोलीस या अपघातग्रस्तांचा शोध घेत आहेत. दरम्यान या भिषण दुर्घटनेचा व्हिडीओ बसच्या मागून येणाऱ्या वाहनावरील डॅश कॅम मध्ये कैद झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three die after bike collides with bus in raigad incident caught on dashcam zws