लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावर मोटार आदळून सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात तीन ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. रत्नागिरी-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील उड्डाणपूलावर हा अपघात झाला असून अपघातग्रस्त कोल्हापूरचे आहेत.

आणखी वाचा-सोलापूर : कॉन्व्हेंट शाळेतील वादातून विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात नेणाऱ्या दोन महिला पोलीस निलंबित

याबाबत माहिती अशी, कोल्हापूर येथील जाधव कुटुंबातील सूर्यकांत जाधव, गौरी जाधव, युवराज जाधव, व प्रशांत चिले हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. पंढरपूरहून ते कोल्हापूरला मोटारीने (एम एच ०९ जी एफ ८३२३) येत असताना शिरढोण गावच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने मोटार उड्डाणपूलावरील दुभाजकावर आदळली. यामध्ये जाधव कुटुंबातील एका महिलेसह तिघे जागीच ठार झाले. तर प्रशांत चिले हे गंभीर जखमी झाले. जखमी चिले यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three died in accident after car hit on divider mrj