कराड : उभ्या असलेल्या ट्रकला मोटारकारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना पुणे-बंगळुरू महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथील भाग्यलक्ष्मी हॉटेलसमोर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
आणखी वाचा-पोलिसांवर पाळत ठेवणाऱ्या जहाल नक्षलवाद्याला अटक, गडचिरोली पोलिसांची मध्यरात्री कारवाई
पोलिसांनी या अपघाताची दिलेली माहिती अशी की नितीन बापूसाहेब पोवार (३४), मनीषा अप्पासाहेब जाधव (३६) व अभिषेक अप्पासाहेब जाधव (२४, तिघेही रा. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. नितीन पोवार हे कोल्हापूर येथील राजवाडा पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आहेत. कोल्हापूरकडून कराडबाजूकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. त्यात मोटारगाडीचा चेंदामेंदा होताना, येथील महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.