मिरजेतील रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने इचलकरंजी येथे एका ट्रॅव्हल एजन्सीवर छापा टाकून ३ लाखाची रेल्वे तिकिटे जप्त केली. या प्रकरणी तिकीट एजंटास अटक करण्यात आली असून बुधवारी त्याला पुणे येथील लोहमार्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  
मिरज, जयसिंगपूर, सलगरे, कवठेमहांकाळ आदी स्थानकांवर रेल्वे तिकिटांचा काळा बाजार होत असलेल्या तक्रारींची दखल घेत सुरक्षा दलातील निरीक्षक गोकुळ सोनोनी, सहायक निरीक्षक अल्लाउद्दीन बागवान, सतर्कता निरीक्षक रामचंद्रनन व आर. आर. कुरूप यांच्या पथकाने इचलकरंजी येथे अग्रवाल ट्रॅव्हल एजन्सीवर छापा टाकला. या वेळी त्या ठिकाणी रेल्वेची १४८ आरक्षित आणि ५५ इ-तिकिटे जप्त करण्यात आली. या तिकिटांचे मूल्य ३ लाख ७ हजार ८६४ रुपये आहे. या प्रकरणी मनीष पवनकुमार अग्रवाल याला अटक करण्यात आली असून, बुधवारी पुणे येथील लोहमार्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Story img Loader