तीन लाख भाविक दाखल,६५ एकर जागेत मुक्काम, कडक बंदोबस्त
माघी एकादशी यात्रेनिमित्त पंढरीत जवळपास ३ लाख भाविक दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि ग्यानबा- तुकारामाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमुन गेली आहे.
वारकरी सांप्रदायात आषाढी, काíतकी, माघी आणि चत्री वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.यंदाच्या माघी यात्रेसाठी भाविक मोठय़ा संखेने दाखल झाले आहेत. या यात्रेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. चंद्रभागेच्या पलतीरावरील ६५ एकर जागेत जवळपास १ लाख ८० हजार भाविक मुक्कामी आहेत. या ६५ एकर जागेत भाविकांसाठी राहण्याची,पिण्याच्या पाण्याची,शौचालय,वीज, दवाखाना, स्वच्छता,पोलीस बंदोबस्त आदी सुविधा पुरवल्या जात आहे. या जागेत विविध ठिकाणाहून आलेल्या जवळपास ५६० िदडी मुक्कामी आहेत. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ६५ एकर जागेवर भाविकांच्या राहण्याची व्यवस्था केली जात आहे. यामुळे शहरातील भाविकांची गर्दी कमी झाली आहे. उच्च न्यायालयाने वाळवंटात राहण्यास मनाई केली आहे. या मुळे प्रशासनाने वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था ६५ एकर जागेत केली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना जलद दर्शन व्हावे या करीता विशेष उपाय योजना केल्या आहेत. एका मिनिटात जवळपास २५ ते ३० भाविक दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडतील, अशी व्यवस्था केली असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी सांगितले.
पालिकेच्यावतीने स्वच्छता आणि वारकऱ्यांसाठी शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात पालिकेला यश आले नाही. पालिकेचे अतिक्रमण पथक पुढे गेले की पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याचे चित्र आहे. यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान,चंद्रभागा नदीला पुरेसे पाणी असल्याने भाविकांना स्नानाचा आनंद घेता येत आहे. एकंदरीत माघी यात्रे निमित्त भाविकांच्या गर्दीने पंढरी दुमदुमुन गेली आहे .
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा