लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : फिरायला जाण्यासाठी म्हणून नेऊन लॉजवर तीन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आटपाडीत उघडकीस आला. पिडीतांच्या तक्रारीनंतर लॉज व्यवस्थापकासह चार जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयितांना पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत होते. तरी देखील ते या मुलीचा वारंवार पाठलाग करत होते. दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पीडितांना फिरायला जाऊ, असे सांगून त्यांना आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिराजवळ बोलवून घेतले. तेथून कौठुळी रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.

आणखी वाचा-अकरावीत शिकणाऱ्या मुलीच्या आत्महत्येनंतर २४ तासांत त्याच शाळेतील मुलाने गळफास घेत संपवले जीवन

याप्रकरणी पांडुरंग हनुमंत यमगर (रा. बनपुरी ता. आटपाडी), सुभाष यमगर (रा. बनपुरी ता. आटपाडी), किरण बाळासो शेंडगे (रा. शेंडगेवाडी ता. आटपाडी) यांच्याविरुध्द बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो अंतर्गत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपी आणि लॉज व्यवस्थापक रिंकू सुरेश यादव अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. चारही आरोपींना बुधवारी (दि.३) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक
दत्तात्रय कोळेकर करत आहेत.