विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. प्रत्येक आमदाराला ७ कोटी रुपये दिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर हे तीन आमदार नेमके कोण याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
हेही वाचा- “२०२४ नंतर पवारसाहेब, अजितदादा मार्गदर्शन करतील पण निर्णय….” रोहित पवार यांचं मोठं विधान
आम्हालाही गटनेते पदाची ऑफर
सध्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे. चार एकर जमीन विकली तर २० लाख रुपये येतील. मात्र, इकडे आमदारांची मते वळवण्यासाठी एका आमदाराला सात-सात कोटी रुपये द्यावे लागतात. उमेदवारासाठी जो घोडेबाजार सुरु आहे तो धक्कादायक आहे. आम्हालाही इतर पक्षांकडून गटनेते पदाची ऑफर देण्यात आली आहे. या बदल्यात एक मर्सडिज, दोन लाख रुपये महिना आणि वर दोन खोकी देऊत, अशी ऑफर देण्यात आल्याचेही मिटकरी म्हणाले.
हेही वाचा- “कमीत कमी अपेक्षा ठेवा”; मंत्रिपदासाठी इच्छूकांना फडणवीसांचा सल्ला
शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका
दीड महिन्यापेक्षा जास्त शिंदे फडणवीस सरकार टिकणार नसल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला आहे. दीड महिन्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष असेल, अशा विश्वासही मिटकरींनी व्यक्त केला आहे.