परभणीचे शिवसेना आमदार संजय जाधव यांना सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तीन वर्षांपूर्वीचे महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत केलेले भांडण आमदार संजय जाधव यांना चांगलेच भोवले आहे. शेतकऱयांसोबत महावितरण कार्यालयात गेलेल्या संजय जाधव यांची महावितरण अभियंत्यांशी बाचाबाची झाली होती. त्यातून संजय जाधव यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. महावितरण अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याप्रकरणी जाधव यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावर जिल्हा न्यायालयाने संजय जाधव यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Story img Loader