ई-क्लास जमिनीत वृक्ष लागवड करण्यास मनाई करून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सातगाव म्हसला येथील पाच महिलांसह दोन पुरुषांना येथील न्यायालयाने दोन गुन्ह्य़ांमध्ये प्रत्येकी तीन महिने सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सातगाव म्हसला ग्रामपंचायतीच्या मालकीची ई-क्लास जमीन बोदेगाव येथील गट नंतर १५१ मध्ये आहे. या जमिनीवर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणार होती. ग्रामसेवक शीतल करंजे व उपसरपंच मजुरांसह वृक्षारोपणाकरिता १३ सप्टेंबर २०११ रोजी गेले असता म्हसला येथील लक्ष्मीबाई देवलाल ब्राम्हणे, सुमन गायकवाड, मंगला शिंगणे, संगीता साबळे, यमुना सबळे, किसन साबळे व झनकलाल ब्राम्हणे यांनी वृक्ष लागवड करण्यास मज्जाव केला, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी ग्रामसेवक शीतल करंजे यांनी धाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. चौकशीअंती हे प्रकरण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पाचवे न्यायालयात न्यायप्रविष्ट करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश एस.बी. विजयकर यांनी सातही आरोपींना दोनही गुन्ह्य़ांमध्ये प्रत्येकी तीन महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास पंधरा दिवसांची साधी कैद, असा निर्णय दिला आहे. प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड. पी. आर. मंगळकर यांनी काम पाहिले.
कामात अडथळा करणाऱ्या ७ जणांना ३ महिने सक्तमजुरीची शिक्षा
ई-क्लास जमिनीत वृक्ष लागवड करण्यास मनाई करून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सातगाव म्हसला येथील पाच महिलांसह दोन पुरुषांना येथील न्यायालयाने दोन गुन्ह्य़ांमध्ये प्रत्येकी तीन महिने सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
आणखी वाचा
First published on: 19-02-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three months jail to seven peoples who stoppage work