यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यात विविध संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या ९१ संशयितांच्या चाचणीचे अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. यापैकी महागाव येथील मृताच्या निकटच्या संपर्कातील तिघेजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. उर्वरित ८८ अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असलेल्या ११ करोनाबाधितांनी करोनावर मात केल्याने आज  सुट्टी देण्यात आली. त्यामुळे ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ४४ वरून ३३ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. त्यापैकी आतापर्यंत १२२ पॉझिटिव्ह रूग्ण उपचारानंतर स्वगृही परतले आहेत. तर तिघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींपैकी २९ जण महागाव येथील आहेत. तर उमरखेडचे २३, पुसदचे ३१, बोरगाव, रूई तलाव आणि मरसुळ व घाटंजी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three more corona positive in yavatmal msr