सोलापुरात आज सकाळी आठ वाजता हाती आलेल्या माहितीनुसार नव्या नऊ करोनाबाधित रूग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या ८६० वर गेली असून मृतांचा आकडा ७८ वर पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज सकाळी ५४ चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात पाच पुरूष व चार महिला करोनाबाधित आढळून आले आहेत. तीन मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अलिकडे करोनाबाधित रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण झाल्याचे दिसून येते. जिल्हा कारागृहात एकाचवेळी ३४ कैद्यांना करोनाची बाधा झाल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तथापि, आतापर्यंत ३५१ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.