यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे तीन पॅनेलमध्ये खडा सामना होत असून, २१ जागांसाठी ६४ उमेदवार रिंगणात आहेत. अगदी सुरुवातीपासूनच मातबर नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने ‘कृष्णा’चा रणसंग्राम चांगलाच गाजत असताना, तिन्ही पॅनेलने सक्षम उमेदवार देण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याने कृष्णा कारखान्याची निवडणूक कमालीच्या चुरशीने होत असून, सत्तासंघर्षांची उत्सुकता ताणली गेली आहे.   
उद्या गुरुवारी (दि. ११) उमेदवारांची अंतिम यांदी प्रसिद्ध होणार असून, २१ जूनला मतदान तर, २३ जून रोजी मतमोजणी होणार आहे. कराड, वाळवा, कडेगाव, पलूस व खानापूर तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या ‘कृष्णा’च्या सभासदांची संख्या जवळपास ५० हजार आहे.
‘कृष्णा’च्या रणसंग्रामात प्रथमच माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी उघड भूमिका घेत काटय़ाने काटा काढण्याची नीति अवलंबली आहे. त्यातून भोसले-उंडाळकर असे मनोमिलन उदयास आले असून, विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत दिसत असलेतरी सध्याच्या स्थितीत त्यांचे संस्थापक पॅनेल प्रबळ असल्याचे दिसून येत आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्यासाठी ही निवडणुक राजकीय अस्तित्वाची ठरत असून, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. पतंगराव कदम यांनी मोहिते बंधूंच्या रयत पॅनेलला पाठबळ दिले असले, तरी काँग्रेस नेत्यांच्या पाठिंब्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी २५० पैकी केवळ ६४ अर्ज शिल्लक राहताना, तीन पॅनेलच्या एकास एक उमेदवाराव्यतिरिक्त केवळ एक अपक्ष रिंगणात उरला आहे.
सत्ताधारी संस्थापक पॅनेलचे उमेदवार असे – पॅनेलप्रमुख व कारखान्याचे अध्यक्ष अविनाश जगन्नाथ मोहिते, कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश गणपती पाटील, सर्जेराव रघुनाथ लोकरे, अशोक मारुती जगताप, संदीप विष्णू पवार, राजेश भगवान जाधव, पांडुरंग यशवंत पाटील, मोहनराव पांडुरंग पाटील (गोपाळा), विक्रमसिंह शहाजीराव पाटील, सुभाष उद्धव पाटील, जयशंकर लक्ष्मण यादव, युवराज रामचंद्र पाटील, उदयसिंह प्रतापराव शिंदे, केदार रघुनाथ शिंदे, पांडूरंग दत्तू मोहिते, दीपक रामचंद्र कणसे (धोंडी), शिवाजी उमाजी आवळे, उमा अजितकुमार देसाई, विजया उत्तमराव पाटील, नितीन शंकर खरात, हरी अण्णा गोसावी.
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे उमेदवार असे – पॅनेलप्रमुख व कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश जयवंतराव भोसले, माजी उपाध्यक्ष दयाराम भीमराव पाटील, जगदीश दिनकरराव जगताप, धोंडीराम शंकरराव जाधव, संभाजीराव बाजीराव पाटील, निवासराव लक्ष्मण थोरात, गुणवंतराव यशवंतराव पाटील, बाबूराव बयाजी यादव, लिंबाजी महीपतराव पाटील, गिरीश शामराव पाटील, जितेंद्र लक्ष्मणराव पाटील, संजय राजाराम पाटील, सुजित शामराव मोरे, संग्राम विश्वासराव पाटील, ब्रिजराज उत्तमराव मोहिते, जालिंदर विठ्ठल निकम, जयश्री माणिकराव पाटील, मालन सर्जेराव पाटील, भीमराव खंडू ढापरे, अमोल बाबूराव गुरव, पांडुरंग महादेव होनमाने.
रयत पॅनेलचे उमेदवार असे- पॅनेलप्रमुख व कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव वसंतराव मोहिते, डॉ. इंद्रजित यशवंतराव मोहिते, सुभाष पांडुरंग जगताप, पांडुरंग भीमराव जगताप, कल्याण महादेव डुबल, नानासो शामराव पाटील, धनाजी तुकाराम पाटील, संभाजी कृष्णा थोरात, मनोहर रघुनाथ थोरात, दीपक वसंतराव पाटील, सयाजी रामचंद्र पाटील, विकास विलासराव पाटील, विश्वासराव संपतराव मोरे, दीपक मनोहर शिंदे, जगन्नाथ निवृत्ती पाटील, संभाजी रामचंद्र पवार, मंदाकिनी पांडुरंग सूर्यवंशी, विजया रघुनाथ कणसे, वसंतराव बाबुराव शिंदे व अविनाश मधुकर खरात.

Story img Loader