अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील आकलापूर येथे वादळीवाऱ्यात घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मुत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे अकलापूर येथील दुधवडे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावाअंतर्गत येणाऱ्या मुंजेवाडी येथे गुरुवारी (९ जून) दुपारी वादळी पाऊस झाला. या पावसाने दुधवडे कुटुंबातील तिघांचा बळी घेतला. मृतांमध्ये १० वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. विठ्ठल दुधवडे (७५ वर्षे), हौसाबाई दुधवडे (67 वर्षे) व साहील दुधवडे (१० वर्षे) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.

हेही वाचा : दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडे उन्मळून पडली; तापमानात मोठी घट, हवाई वाहतुकीवरही परिणाम

संगमनेरमधील वादळी पावसाने दुधवडे कुटुंबावर मोठा आघात केलाय. संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त केलं आहे. यामध्ये जखमी असलेल्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे.

Story img Loader