पुण्याच्या बावधान मध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी हिंजवडी पोलिस दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मुळशीमध्ये देखील अशीच घटना घडली होती. सुदैवाने त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन मध्ये पावणे सातच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. धुकं असल्याने बराच वेळ हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घेत होत. अखेर ते क्रॅश झालं आणि जमिनीवर कोळलं. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस पोहचले आहेत. याआधी देखील मुळशी मध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळलं होतं सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती. परंतु, त्या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडलेली आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर मुंबईच्या जुहूमधील ऑक्सफोर्ड गोल्फ कोर्स रेसॉर्टला जात होतं. घटनेची माहिती मिळताच आमची पथकं मदतीसाठी घटनास्थळी रवाना झाली आहेत.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीशकुमार पिल्ले, प्रितमचंद भरद्वाज व परमजीत अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत.