अलिबाग – अलिबाग ते रेवस मार्गावर चोंढीजवळ भरधाव कार थेट गॅरेजमध्‍ये घुसून अपघात झाला. यात गॅरेजमालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. त्‍याच्‍यावर अलिबागच्‍या जिल्‍हा रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाला. रवी पाटील(वय ५०) रा. धोकवडे (गॅरेजमालक),  मंगेश यशवंत म्हात्रे (वय ५२) रा. आगरसुरे, सोनू मधु नाईक (वय ४५) रा. किहीम अशी जखमींची नावे आहेत. काल संध्‍याकाळी साडेपाच वाजण्‍याच्‍या सुमारास ही भरधाव बीएमडब्‍ल्‍यू  कार अलिबागकडून रेवसच्‍या दि शेने नि घाली होती. चोंढी गावापासून जवळच डे फार्म हाऊस शेजारी रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेल्‍या गॅरेजच्‍या शेडला धडक देत थेट आत घुसली. यात गॅरेजमध्‍ये दुरूस्‍तीसाठी आलेल्‍या दुचाकी वाहनांचेही नुकसान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विमा योजनेत जाचक अटी घालून कोकणातील आंबा – काजू बागायतदारांवर अन्याय

अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मांडवा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी झालेल्या तिघांना इतर वाहन चालकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आणि वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २८१,१२५(अ) १२५ (ब), सह मो.वा. का. १९८ ९ (क) १८४. १८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. कारचालक संदीप विलास गायकवाड यांची मद्यसेवन बाबतीत वैद्यकीय तपासणी करण्यात आली  आहे. अपघाताबाबत अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्‍याचे निरीक्षक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खोत करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three seriously injured after a speeding luxury car crashed straight into a garage in alibaug zws