लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर: इचलकरंजी शहरात तीन झीका विषाणूचे तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये एका डॉक्टरासह गर्भवती महिलांचाही समावेश आहे. याची दखल घेवुन इचलकरंजी शहरात रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. याबाबत जिल्ह्यातील वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांची उद्या सोमवारी इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आयोजित केली आहे.

इचलकरंजीतील एक डॉक्टर कोकणामध्ये देवदर्शनासाठी गेले होते. वाहनतळाच्या ठिकाणी त्यांना डासांनी मोठ्या प्रमाणात चावा घेतल. त्यानंतर ते आजारी पडले. त्यांचे रक्त तपासणीसाठी कोल्हापुरातील एका खाजगी तपासणी संस्थेमध्ये पाठवण्यात आले असता त्यामध्ये झिका सदृश्य विषाणू आढळून आला. या रुग्णा पाठोपाठ आणखी दोन संशयित रुग्ण  आढळून आले आहेत. या तीनही रुग्णांचे रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रातील प्रयोगशाळेत पाठवण्यात झाले असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.शहरातील तांबे माळ व गावभाग परिसरात रुग्ण आढळून आल्यामुळे तेथील  आरोग्य  यंत्रणा तात्काळ गतिमान झाली आहे.

आणखी वाचा-यंदा धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी; दोन कोटींची बक्षीसे, विजेत्या मल्लास स्कॉर्पिओ गाडी

झिका म्हणजे काय?

झिका विषाणू रोग हा प्रामुख्याने एडिस डासांच्या द्वारे प्रसारित होणाऱ्या विषाणूमुळे होतो, जो दिवसा चावतो. लक्षणे सामान्यत: सौम्य असतात आणि त्यात ताप, पुरळ, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता किंवा डोकेदुखी यांचा समावेश होतो. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three suspected patients of zika virus in ichalkaranji mrj
First published on: 03-09-2023 at 22:21 IST