होळी सणासाठी रायगड सज्ज झाला आहे. गणेशोत्सवानंतर सर्वात मोठय़ा प्रमाणात साजरा होणाऱ्या सणासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्य़ात तीन हजार ९०० ठिकाणी होळी पूजन होणार असून या पाश्र्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
होळी सणाच्या अगोदर नऊ दिवस जिल्ह्य़ात काही ठिकाणी लहान-मोठय़ा होळ्या उभारल्या जातात. लहान-मोठी माणसे यात सहभागी होत असतात. जिल्ह्य़ात या वर्षी सव्वीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल तीन हजार नऊशे होळ्यांचे पूजन केले जाणार आहे. या सणासाठी चाकरमानी मोठय़ा प्रमाणात दाखल होणार आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी एक एसआरपीएफ कंपनी चारशे महिला आणि पोलीस होमगार्ड आणि जिल्ह्य़ातील ऐंशी टक्के पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत. दरम्यान सण साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. जिल्ह्य़ात वणव्यामुळे जंगलातील झाडे, प्राणी आणि आदिवासींच्या घरांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील लाकडांची तोड करू नये, असे आवाहन वनअधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा