महाड दुर्घटनेतील प्रशासकीय यंत्रणांची जबाबदारी तीन महिला अधिकारी समर्थपणे पेलत आहेत. यात रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्यासह प्रांताधिकारी सुषमा सातपुते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनवणे या तिघींचा समावेश आहे. सलग सात दिवस घटनास्थळावर अहोरात्र काम करून त्या तिघींनी मदत व बचाव कार्याचे नेतृत्व केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाड येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे २ ऑगस्टला सावित्री नदीवरील पूल कोसळला. यात दोन एसटीच्या बस आणि १ तवेरा गाडी वाहून गेली. या दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही १५ जण बेपत्ता आहेत. गेल्या सात दिवसांपासून महाड परिसरात सुरू असलेल्या या शोध व बचाव पथकाचे नेतृत्व तीन महिला अधिकारी करीत आहेत.

महाड दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी आपत्तीनिवारण व मदत कक्ष स्थापन केला आहे. शोध व बचाव मोहिमेची सर्व सूत्रे या ठिकाणाहून हलवली जात आहेत. या नियंत्रण कक्षात समन्वयक म्हणून महाडच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनवणे या काम पाहत आहेत. बेपत्ता लोकांची यादी तयार करणे, मृतांची ओळख पटवणे, ठिकठिकाणी आढळलेल्या मृतदेहांची महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्याची व्यवस्था करणे, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणे, मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करणे, महाडमध्ये आलेल्या नातेवाईकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करणे, बचाव व शोधपथकात सहभागी झालेल्या एनडीआरएफ, नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस तसेच महसूल कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे अशा अनेक पातळींवर एकाच वेळी या दोघींना काम करावे लागत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही महिला अधिकारी ते समर्थपणे पेलत आहे.

रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले गेले सात दिवस महाडमध्ये तळ ठोकून आहेत. बचाव यंत्रणांमधील समन्वय राखणे, दिवसभरातील शोधकार्याचे नियोजन करणे, संध्याकाळनंतर दिवसभरातील घडामोडींचा राज्य सरकार आणि केंद्र सरकारला अहवाल सादर करणे, महाडमध्ये येणाऱ्या मंत्री आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची व्यवस्था करणे, त्यांना सुरू असलेल्या शोधकार्याची माहिती देणे, बचाव यंत्रणांना आवश्यक असणारी सामग्री उपलब्ध करून देणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि जिल्हाधिकारी म्हणून या दुर्घटनेत कार्यरत असणाऱ्या सर्व यंत्रणांचे नेतृत्व करणे यांसारख्या भूमिका त्यांना पार पाडाव्या लागल्या आहेत. दीड वर्षांच्या मुलाची आई म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून त्या प्रशासकीय जबाबदारीला प्राधान्य देण्यात कुठेही कमी पडलेल्या नाहीत.

अधिकारी म्हणून जेव्हा महिला एखाद्या पदावर कार्यरत असते तेव्हा तिला त्या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. महिला असल्याने त्यात सूट मिळत नाही. उलट महिला या मुळातच संवेदनशील असल्याने त्या चांगले काम करू शकतात हे या तिघींनी दाखवून दिले आहे.