भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख ‘लांडगा’ असा केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर चौफेर सडकून टीका करण्यात येत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पडळकरांविरोधात अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी आंदोलनही केली आहेत. आता पडळकरांना काळं फासा आणि एक लाख मिळवा, अशी घोषणा अजित पवार यांच्या गटातील नागपूर शहरांध्यक्षांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना अजित पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले, “पडळकर दिसतील तिथे भर चौकात जोड्यानं मारा. नंतर पडळकरांना काळं फासून नागपूरला येत एक लाख मिळवा. हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करत आहे.”

हेही वाचा : “अजित पवारांचा अपमान करण्यासाठी भाजपानं…”, पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या

“पडळकरांची जागा दाखवल्याशिवाय ते सुधारणार नाहीत. नागपूरला आल्यावर पडळकरांना सोडणार नाही. पडळकरांनी नागपूरला येऊ नये. आल्यावर मार खाल्याशिवाय जाणार नाहीत,” असा इशारा प्रशांत पवारांनी पडळकरांना दिला आहे.

हेही वाचा : “पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवारांना लांडगा म्हणत असेल, तर…”, काँग्रेस नेत्याचं विधान

पडळकरांचं वक्तव्य काय?

“धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Throw ink gopichand padalkar and get one lakh prashant pawar nagpur over ajit pawar controversey statement ssa
Show comments