‘तिबोटी खंड्या’ हा आता रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी असणार आहे. कर्नाळा अभयारण्यात आढळणारा अतिशय सुंदर आणि मनमोहक पक्षी आहे. ‘ओरियंटल ड्वार्फ किंगफिशर’ नावानेही हा ओळखला जातो. पर्यटन दिनानिचे औचित्य साधून पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालक मंत्री अदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी ही घोषणा केली.    

जिल्ह्यात मे ते ऑक्टोबर पर्यंत तिबोटी खंड्या या पक्षाचा अधिवास आढळून येतो. गलात ओढा, तलाव, मातीच्या कड्यात जिथे जमिन भुसभुशीत असेल तिथे एक मीटर घरटे करून हा पक्षी राहतो. हा पक्षी त्याचा आकार व चमकदार रंगामुळे वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. कपाळावर काळा डाग, मानेच्या बाजूला निळा आणि पांढरा रंग, पंख गडद निळ्या व काळ्या रंगाचे असतात. मानेवरील भाग पिवळसर केसरी असतो. चोच पिवळसर नारंगी रंगाची असून शिपटी नारंगी गुलाबी असते. पक्षाच्या तळव्याला तीन बोट असल्याने याला तिबोटी खंड्या असे म्हणतात.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”

मे, जून महिन्यात रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आढळतो –

  तिबोटी खंड्या हा पक्षी भारतामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी ईशान्य राज्य व अग्नेय भागात आढळतो. हा पक्षी रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांश ढिकाणी माहे मे, जूनमध्ये प्रजननासाठी येतो. त सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान परत जातो. भारतात आढळणार्‍या एकूण १२ खंड्याच्या प्रजातींमधील तिबोटी खंड्या आकाराने सर्वात लहान ( १२ ते १४ सेमी) खंड्या पक्षी आहे. तिबोटी खंड्या हा पक्षी सखल जंगलामध्ये राहतो.

आयुष्यमान चार ते पाच वर्षांच असते –

  तिबोटी खंड्या जून – जुलै महिन्यात आपल्या घरट्यात सरासरी पाच अंडी घालतात. अंडी एकदिवसाच्या अंताराने घलतात. अंडी दिल्यानंतर नर व मादी दोन्ही अंडी उबवतात. अंडी उबविण्याचा कालावधी १७ ते १८ दिवसांचा असतो. या पक्षांच आयुष्यमान चार ते पाच वर्षांच असते. तिबोटी खंड्याला भेडसावत असलेला मुख्य धोका म्हणजे त्यांचा अधिवास नष्ट होणे व मानवी हस्तक्षेप आहे. त्यामुळे हा पक्षाचा अधिवास संरक्षित करणे, त्याला पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन तिबोटी खंड्याला रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या पक्षाबद्दल जनमानसात पुरेशी माहिती नाही – तटकरे

”  तिबोटी खंड्या या पक्षाबद्दल जनमानसात पुरेशी माहिती नाही. या पक्षाबद्दल लोकांना माहिती व्हावी त्याचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याला रायगड जिल्हा पक्षी घोषित करण्यात आले आहे. या पक्षाचे जतन व संवर्धन करणे करिता मदत  होणार आहे.” असं रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.