बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील केशव नगर परिसरातील नागरिकांना वाघ सदृश्य प्राणी दिसला होता. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील तो प्राणी वाघच असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. या वाघाला शोधण्यासाठी वन अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, घाटपुरी नाक्याजवळ असलेल्या झुडपात वाघ दडून बसला असल्याची माहिती मिळाली. पाहुयात या वाघाला पकडण्यासाठी अधिकारी कशाप्रकारे प्रयत्न करत आहेत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या हा संपूर्ण परिसर वाघाच्या दहशतीखाली आहे. दरम्यान, खामगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger entered in village in buldhana pvp