लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर: लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून गांधी-नेहरूंचा वैचारिक वारसा संपविण्यासाठी आणि देशात हुकूमशाही लादण्यात कार्यमग्न असल्याचा ज्यांच्यावर आक्षेप घेतला जातो, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यावरून वादंग माजले असतानाच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले आहे.

Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Kavitha Krishnamurthy, Shubha Khote, Anupam Kher
शुभा खोटे, अनुपम खेर यांना ‘पिफ’ पुरस्कार जाहीर; एस. डी. बर्मन पुरस्कार कविता कृष्णमूर्ती यांना
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Manohar joshi Sushil Modi Bhulai bhai
मनोहर जोशी ते सुशील मोदी; भाजपा व एनडीएशी संबंधित कोणकोणत्या नेत्यांना मिळाला पद्म पुरस्कार?
ashok saraf conferred with padma shri wife nivedita express gratitude
“प्रेक्षकांना नेहमी देवासमान…”, अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर होताच पत्नी निवेदिता यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने पंतप्रधान मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. टिळक पुण्यतिथीनिमित्त १ आॕगस्ट रोजी हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रमुख सत्ताधारी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा-Video : राज ठाकरे कसा माणूस आहे? अतुल परचुरेंचं दिलखुलास उत्तर; म्हणाले, “मी खूप तास…”

काँग्रेसी विचार परंपरा जपणा-या टिळक स्मारक ट्रस्टने पंतप्रधान मोदी यांना टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केल्यामुळे राज्यात वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या काही पदाधिका-यांसह सेवादल, इंटक तसेच आम आदमी पार्टी (आप) तसेच युवक क्रांती दलाने (युक्रांद) आदी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत मोदी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यास विरोध केला आहे.

या पार्श्वभूमीवर टिळक स्मारक ट्रस्ट मंडळाचे विश्वस्त असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत मौन बाळगले. विश्वस्त मंडळाने पुरस्काराचा निर्णय एकमताने घेतला आहे. त्यावर आपण बोलणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader