लोकसत्ता वार्ताहर

सावंतवाडी : गोवा – दोडामार्ग – बेळगाव – कोल्हापूरला जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातील धोकादायक जयकर पॉईंट उतारावर एका ठिकाणी संरक्षण कठडा रस्ता खचला आहे. हे कारण पुढे करून चाळीस वर्षे सुरू असलेली एस टी बस सेवा सात महिने बंद आहे. प्रवाशांची गैरसोय झाली आहे. पण अशा परिस्थितीत खाजगी वाहने सुरू आहेत. एस टी बस सेवा सुरू झाली पाहिजे यासाठी संरक्षण कठडा दुरुस्ती कामाला सुरुवात करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता.

या नंतर बांधकाम विभाग चंदगड कोल्हापूर यांनी टेंडर काढले. हे दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी तिलारी घाट सर्व वाहतूकीसाठी बंद ठेवला आहे. असे पञ बांधकाम विभाग चंदगड यांनी जाहीर केले आहे. दोडामार्ग चंदगड पोलिस याना कळवले आहे. त्यामुळे वाहन धारकांनी तिलारी घाट मार्गे प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.

पावसाळ्यात तिलारी घाटात दरडी कोसळणे, रस्ता खचणे या गोष्टी विचारात घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी २१ जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व अवजड वाहने यांना बंदी घातली होती. पण अवजड वाहने सुरू होती. पावसाळ्यात तिलारी घाटात जयकर पॉईंट उतारावर रस्ता संरक्षण कठडा तुटला होता. जुलै मध्ये ही घटना घडली होती. या ठिकाणी बॅरल ठेवले होते.

तिलारी घाटातील अवजड वाहने बंदी उठवली पण एस टी बस सेवा सुरू झाली नव्हती तेव्हा रस्ता रोको आंदोलन उपोषण सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस, कोदाळी सरपंच, इतर सामना कार्यकर्ते यांनी केले होते. या नंतर कोल्हापूर विभाग नियंत्रण यांनी घाटाची दोन वेळा पाहणी केली. पण संरक्षण कठडा दुरुस्ती झाल्याशिवाय एस टी बस सेवा सुरू केली जाणार नाही असे सांगितले.

Story img Loader