काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी लवकरच अजित पवार गटात सामील होते. यावरून राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसमधील आणखी एका बड्या नेत्याने पक्षांतर केले तर काँग्रेसला फार मोठा धक्का मानला जात आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाऊ शकतात. याचा अर्थ ते भाजपाबरोबर जात आहेत. आतापर्यंत त्यांनी प्रवेश केलेला नाही. ते झिशान सिद्दीकीसह अजित पवार गटात गेल्यास तिथे (वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ) विधानसभेची जागा रिकामी होईल. त्यानंतर तिथे शिवसेना जिंकेल. या मतदारसंघातील मुस्लिम समाजात फूट पाडण्याकरता भाजपाकडून हे केलं जात आहे. बाबा सिद्दीकीसारखे लोक असं करत असतील तर समाज आणि देश त्यांना माफ करणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> मिलिंद देवरांनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का, बाबा सिद्दिकी अजित पवार गटाच्या वाटेवर?

दरम्यान, छगन भुजबळ भाजपात जाणार असल्याचा मोठा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. या दाव्यावर संजय राऊत म्हणाले, “अंजली दमानियांचं वक्तव्यं ऐकलं. छगन भुजबळ कोणत्या पक्षात जाणार हे मी सांगू शकत नाही. पण ते भाजपाचा चेहरा बनू शकतात. हसन मुश्रीफ, अजित पवार, भावना गवळी भाजपाचे चेहरा बनले आहेत. भ्रष्टाचारच भाजपाचा चेहरा आहेत. जो भ्रष्टाचारी भाजपासह चालेल तो पवित्र बनेल”, अशी टीका राऊतांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To divide the muslim community raut criticizes the possibility of baba siddiqui joining ajit pawar group sgk